ठाणे:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ वर्षीय पीडित मुलगी उत्तर प्रदेशात राहते. दीड महिन्यापूर्वी तिला नराधम काकांनी आपली मोठी सून बाळंत होणार असल्याने घरकामासाठी म्हणुन भिवंडी नजीक असलेल्या घरी आणले होते. या काळात ५२ वर्षीय काकासह २२ वर्षीय चुलत भाऊ या दोघांची वाईट नजर या अल्पवयीन पीडितेवर पडली. त्यांनी वेगवेगळ्या दिवशी पीडितेवर बलात्कार केला. (Uncle rapes his minor nephew) या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडितेने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती भिवंडीतच राहणाऱ्या मावशीला दिली. त्यानंतर मावशीने तातडीने पीडितेस घेऊन थेट इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालय (Indira Gandhi Government Hospital) तपासणी साठी नेले.
Rape Of Minor Girl : अल्पवयीन पुतणीवर काकासह मुलाचाही बलात्कार
नात्याने काका व चुलत भाऊ लागत असलेल्या बाप लेकाने ( along with his son) १४ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर बलात्कार (Uncle rapes his minor nephew) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना भिवंडी तालुक्यात एका गावात घडली आहे. याप्रकरणी बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल (Crimes under Pokso including rape) करण्यात आला आहे. मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधम बाप- लेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती भिवंडी तालुका पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, महिला पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. रत्ने पोलीस पथकासह पीडितेचा रुग्णालयात जबाब नोंदवला. नंतर नराधम काका व चुलत भाऊ यांच्या विरोधात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच दोघे बाप - लेक उत्तर प्रदेश मध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पथकाने शिताफीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेत अटक केली. या नराधमांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.