ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामधील नांदिवली येथील सर्वोदय पार्क परिसरातील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेल्या ७ मजली इमारतीवर महापालिकेने कारवाई केली. ही कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी केली. या कॉम्प्लेक्सचे विकासक आणि जमीन मालक मधुकर म्हात्रे यांनी या जागेत अनधिकृत इमारत बांधली होती.
उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत ७ मजली इमारतीवर केडीएमसीचा हातोडा - thane
ही इमारत अनधिकृत असल्याने तिला निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि उप आयुक्त सुनिल जोशी यांना दिल्या. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत उध्वस्त करण्यात आली. या कारवाई पूर्वी प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी इमारत मालकाला महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुद २६०,४७८ आणि ३७९ अन्वये कायर्पध्दतीचा अवलंब करून नोटिस बजावली.
ही इमारत अनधिकृत असल्याने तिला निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि उप आयुक्त सुनिल जोशी यांना दिल्या. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत उध्वस्त करण्यात आली. या कारवाई पूर्वी प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी इमारत मालकाला महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुद २६०, ४७८ आणि ३७९ अन्वये कायर्पध्दतीचा अवलंब करून नोटिस बजावली. त्याअनुषंगाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या इमारतीत रहिवास नसल्याने तिचे कॉलम व भिंती पाडण्यात आल्या. इमारत निष्कासित करतेवेळी ई प्रभाग कार्यालयाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, फ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव व त्यांच्यासोबत इतर कर्मचारी या मोहिमेत सामिल झाले होते. मानपाडा पोलीस ठाणे व महापालिकेच्या पोलीस बंदोबस्तासह १ जेसीबी, १ पोकलन व कॉम्प्रेसरच्या सहायाने ही कारवाई करण्यात आली. अशी कारवाई यापुढेही चालू ठेवण्याचे निर्देश आयुक्त गोविंद बोडके यांनी सर्व प्रभाग क्षेञ अधिकाऱ्यांना दिले आहेत.