ठाणे -Maratha Reservation: शिंदे -फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) सत्तेत आल्यापासून अनेक निर्णय या सरकारमधे घेण्यात आले. मात्र मराठा आरक्षणावरील निर्णय अजून बाकी असल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले. शिंदे फडणवीस सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागील महाविकास आघाडीमुळे सुप्रीम कोर्टातील मराठ्यांचे आरक्षण रद्द ( Maratha reservation canceled ) झाले. त्यांची नाराजी व्यक्त केली. समाजाला आरक्षण कश्याप्रकारे देणार हे सांगावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला. ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती सरकारने केली. त्या विद्यार्थ्यांना आघाडी सरकार काळातील ( Mahavikas Aghadi Govt ) अधिकारी रुजू करून घेत नसल्याचा गंभीर आरोप ठोक मोर्चा कडून करण्यात आला.
Maratha Reservation: शिंदे- फडणवीस सरकारला मराठा क्रांती ठोक मोर्चकडून दहा दिवसांचा अल्टिमेटम, आंदोलनाचा इशारा - Maratha Kranti Thok Morcha
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील निर्णय अजून बाकी असल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले. शिंदे -फडणवीस सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागील महाविकास आघाडीमुळे सुप्रीम कोर्टातील मराठ्यांचे आरक्षण रद्द ( Maratha reservation canceled ) झाले. समाजाला आरक्षण कश्याप्रकारे देणार हे सांगावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला. ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती सरकारने केली. त्या विद्यार्थ्यांना आघाडी सरकार काळातील ( Mahavikas Aghadi Govt ) अधिकारी रुजू करून घेत नसल्याचा गंभीर आरोप ठोक मोर्चा कडून करण्यात आला.
मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी -मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही विद्यार्थ्यांना हजर करून घेत नसल्याने अश्या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आबासाहेब पाटील यांनी केली. १०६४ नियुक्त्या केल्याबद्दल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले तसेच अधिकाऱ्यांना २ दिवसांचा अल्टिमेटम ( two days ultimatum to officials ) देत. या मुलांना लवकर रुजू करून नाही घेतले तर मुजोर अधिकाऱ्यांच्या दालनात मुलांना घेऊन आंदोलन करणार असल्याचं इशारा देखील यावेळी ( Warning of portest if no appointments are made ) दिला. तसेच मराठा समाजासाठी काम करणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांना काही समन्वयक त्रास देत आहेत. त्यांची नावे लवकरच जाहीर करू असे आज सांगण्यात आले आहे .
सुप्रिया सुळे, अनिल बोंडेंनी माफी मागावी -सुप्रिया सुळे आणि अनिल बोंडे यांनी देखील मराठा समाज बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ज्या व्यक्तींनी तानाजी सावंत यांचा निषेध केला ते सुप्रिया सुळे आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांना माफि मागायला लावणार का असा सवाल देखील पदाधिकाऱ्यांनी विचारला. तसेच सरकार करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल ठोक मोर्चाच्यावतीने अभिनंदन आणि आभार देखील मानले.