ठाणे -उल्हासनगरात लॉकडाऊन काळात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी एका आठवड्यात १ हजार ७०० रुग्ण वाढल्याने महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. रविवारी १२ जुलैला लॉकडाऊन संपणार होता. त्यातच जिल्ह्यातील सर्वच महापालिकांनी लॉकडाऊन वाढविल्याने अखेर पालिका आयुक्तांनी शनिवारी एक प्रसिद्ध पत्रक काढून लॉकडाऊन १२ ते २२ जुलैपर्यंत वाढविल्याचे जाहीर केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी लॉकडाऊन २२ जुलैपर्यंत वाढविला. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले असून व्यापारी संघटनेने लॉकडाऊनला पाठिंबा दिला. कोरोनाची संख्या ३ हजार ९१४ वर पोहोचली आहे. यामुळे महापालिका आरोग्य सेवेवर ताण वाढला आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी यापूर्वी २ ते १२ जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर केला होता.