महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्हासनगरात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी आढळले 129 नवे रुग्ण - उल्हासनगर कोरोना रुग्ण

उल्हासनगरातही कोरोनाचा कहर सुरूच असून शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्ब्ल 129 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे.

उल्हासनगर कोरोना अपडेट
उल्हासनगर कोरोना अपडेट

By

Published : Jun 26, 2020, 12:29 PM IST

ठाणे -उल्हासनगरातही कोरोनाचा कहर सुरूच असून शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्ब्ल 129 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे, कालच्या एका दिवसात कोरोनावर मात केलेले 64 रुग्ण घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 791 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात 25 जूनला कोरोनाचे 129 रुग्ण आढळले आहेत. एकूण 576 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 791 कोरोना मुक्त रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना संक्रमित 39 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

उल्हासनगर शहरातील सरकारी कोरोना केअर सेंटर कक्षात 248 रुग्ण, खासगी कोरोना केअर सेंटर कक्षात 40 रुग्ण, डीसीएचसीमध्ये 128 रुग्ण, सीसीएचमध्ये 72 रुग्ण, होम आयसोलेशनमध्ये 42 तर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेरील 46 रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.

गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पहाता कॅम्प नंबर 1मध्ये 18 रुग्ण, कॅम्प नंबर 2मध्ये 30 रुग्ण, कॅम्प नंबर 3मध्ये 33 रुग्ण, कॅम्प नंबर 4मध्ये 27 रुग्ण कॅम्प नंबर 5मध्ये 21 रुग्ण, असे एकूण 129 रुग्ण उल्हासनगर शहरात आढळून आले. तर आतापर्यंत 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले.

गेल्या आठड्यात उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्तपदावर डॉ. मतांडा राजा दयानिधी यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आली असून तत्कालीन पालिका आयुक्त समीर उन्हाळे यांची नाशिक महापालिकेत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी यांच्यापुढे कोरोना संसर्गाचे नवे आव्हान असून ते या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातात, हे येणारा काळच सांगेल. नवनियुक्त आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी हे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details