ठाणे - राज्यातील सत्तास्थापनेचे नाट्य थांबण्याचे नाव घेईना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडी सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे शक्तिप्रदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडी सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आम्ही महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आमचे संख्याबळ सिद्ध करून दाखवू. बुधवारी होणार्या शक्तिप्रदर्शनासाठी शिवसेना पक्ष समर्थ आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा - ...अशी असेल विश्वासदर्शक चाचणी!
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे ही सर्व शिवसैनिकांची आणि आमदारांची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असतील, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.