महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे न्यूज

इतर राज्यात किंवा जगभरात अनलॉक करण्याची घाई गडबड केली आहे. परंतु, तशी घाई महाराष्ट्र तसे अजिबात करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Aug 24, 2020, 9:33 PM IST

ठाणे - राज्यात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आले असले तरी महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आधी सर्व सुरु करायचे आणि नंतर ते बंद करण्याची वेळ येऊ नये , त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाला बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफील राहू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अनलॉक करण्याची घाई नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व अधिकारी उपस्थित होते. या आढाव्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एमएमआर रिजन मधील पालिका कोरोनाच्या संदर्भात करत असलेल्या उपाय योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. देशात कोरोना संदर्भात जी लढाई सुरु आहे त्यात महाराष्ट्र कुठेही मागे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केली.

इतर राज्यात किंवा जगभरात अनलॉक करण्याची घाई गडबड केली आहे. परंतु, तशी घाई महाराष्ट्र तसे अजिबात करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथील महापालिकांना मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना दिल्या असे सांगितले. एमएमआर रिजनमध्ये कोरोना रोखण्यात आल्यामुळे कौतुकाची थाप मिळत असली तरी गाफील न राहता आपल्याला हा आकडा शून्यापर्यंत आणायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत होती, मात्र गेल्या महिनाभरात डॉक्टर्स, नर्स, पोलीस, शासकीय आणि पालिका यंत्रणांनी चांगल्या पद्धतीने मुकाबला केला असून या सर्व यंत्रणाचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गणपती उत्सव सुरु झाला आहे, दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. परंतु यापूर्वी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, उत्सव कसा होणार, विसर्जन कसे होणार पंरतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरे केले. मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांनी साधेपणाने सण साजरे केल्यामुळे सर्वांचे कौतुक केले.

कल्याण डोंबिवलीत जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता ती रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील २० ते २५ दिवसात यात नक्कीच बदल दिसून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खासगी रुग्णालयात आजही जर लुट होत असेल तर तक्रार करा, त्या तक्रारीची नक्कीच दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कळवा आणि मुंब्रा येथील ११०० बेडच्या कोविड सेंटरचे ई-लोकार्पण ...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते म्हाडाने तयार केलेल्या कळवा आणि मुंब्य्रातील 1100 बेडचे कोविड केअर सेंटरचे ई- लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रासह आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता रुग्णांना बेड मिळणार नाही, अशी तक्रार देखील येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाण्याच्या बाबतीत केले समाधान व्यक्त ...

मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेचा आढावा पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडून घेतला तसेच इतर अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ठाण्याच्या पारिस्थितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले असून निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगितले. दुसरीकडे झपाट्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या ठाण्याच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, पावसाळ्याचा काळ असल्याने गाफील राहू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

खड्ड्यांबाबत केली नाराजी व्यक्त ...

ठाण्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे खड्डे त्वरित भरावेत, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाण्याला येताना रस्त्यावर खड्डे असल्याचे लक्षात आल्याचेही मुखयमंत्र्यांनी लक्षात आणून दिले. खड्ड्यांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. ठाण्यात खड्ड्यांवर राजकीय वादंग सुरू असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले होते. प्रशासनामुळे सत्ताधारी बदनाम होत असल्याचा आरोप देखील यापूर्वी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ठाण्यातील खड्ड्यांच्या संदर्भात प्रशासनाला धारेवर धरुन विरोधकांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details