महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Rajan Vichare : आमच्या हल्ल्यामागील सूत्रधार एकनाथ शिंदे ; उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचा आरोप - Uddhav Thackeray group MP Rajan Vichare

दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील किसननगरमध्ये घडलेल्या घटनेमागे (Eknath Shinde behind attack) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (MP Rajan Vichare alleged Eknath Shinde) हे मास्टर माइंड आहे, असा आरोप ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे (Uddhav Thackeray group MP Rajan Vichare) यांनी केला.

MP Rajan Vichare
उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे

By

Published : Nov 19, 2022, 9:15 AM IST

ठाणे :दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील किसननगरमध्ये घडलेल्या घटनेमागे (Eknath Shinde behind attack) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (MP Rajan Vichare alleged Eknath Shinde) हेच मास्टर माइंड आहे असा आरोप ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे (Uddhav Thackeray group MP Rajan Vichare) यांनी केला. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. आणि त्यावेळेस शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती.

पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे :या घटनेनंतर ठाकरे गटाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र या दरम्यान शिंदे गटाकडून पोलीस ठाण्याला देखील घेराव टाकला होता. यावेळी पोलिसांवर दबाव टाकून ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे देखील टाकण्यात आले आहे. त्या दिवसाची परिस्थिती पाहून ठाण्याला युपी बिहारचे स्वरूप आल्याचे खासदार राजन विचारे यांनी (MP Rajan Vichare alleged ) सांगितले.

माध्यमांंशी बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे


कट पूर्वनियोजित :ही मारहाण करण्यासाठी जमाव मागवण्यात आला होता. यात तडीपार केलेले गुंड देखील सहभागी होते. त्यामुळे हा कट पूर्वनियोजित असून त्यांनतर आमच्यावर चेन स्नेचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप देखील विचारे यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जबाबदार धरले.

ABOUT THE AUTHOR

...view details