महाराष्ट्र

maharashtra

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना सल्ला

By

Published : Oct 18, 2019, 8:47 AM IST

Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. तरीही गाफील राहून, डोक्यात हवा जाऊ देवू नका, असा गर्भित सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

ठाण्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे

ठाणे - सत्तेची लालसा निर्माण झाली की, भल्या-भल्यांची कशी अधोगती होते याचे काँग्रेस उत्तम उदाहरण आहे. देश हा भूखंड नसून येथील लोकांच्या इच्छेनुसार देशाचा कारभार चालतो, हे काँग्रेस विसरली. म्हणूनच राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. तरीही गाफील राहून, डोक्यात हवा जाऊ देवू नका, असा गर्भित सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील प्रचार सभेत ठाकरे बोलत होते.

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना सल्ला


ठाण्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी सर्व कामे करून ठेवली आहेत. त्यामुळे प्रचारासाठी ठाण्यात आलो की, काय बोलावे हे समजत नाही. निवडणुका कोणत्याही असल्या तरी ठाणेकरांचा आशीर्वाद हा शिवसेनेलाच असतो. ठाणेकर हेच शिवसेनेचे बळ आहे. तुमच्यासोबत मी कोणतीही लढाई जिंकू शकतो. फक्त ठाण्यातीलच नाही नाही, तर महायुतीच्या २८८ जागा जिंकण्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - भिवंडीत ज्वलनशील केमिकल साठ्यावर पोलिसांची धाड, ८ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

या सभेला शिवसेना नेते-पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते अनंत तरे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, महापौर मिनाक्षी शिंदे, शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक, संजय केळकर, भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले हे उपस्थित होते.

Last Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details