ठाणे - समोरूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण आम्ही तुम्हाला मतं का द्यायची याचे त्यांच्याकडे उत्तरच नाही. तरी सुद्धा बिनविचाराची माणसं देश हातात घ्यायला निघाले, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांना लगावला. ते कल्याण पूर्वेत आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. तसेच कल्याण मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. आमच्यात एकमत झाले आहे. मात्र पलिकडे असणाऱ्यांची बिन चेहऱ्याची आघाडी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी आघडीवर केली.
बिनविचाराची माणसं देश हातात घ्यायला निघाले, उद्धव ठाकरेंची आघाडीवर टीका - congress
सभेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बॅट्समनने बोलून नाही तर कामाने करून दाखवला असल्याचे ठाकरे म्हणाले.
कल्याण पूर्व चक्की नाका येथील मैदानावर आज महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सुभाष भोईर, आमदार गणपत गायकवाड, आमदार बालाजी किणीकर, महापौर विनिता राणे,भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वचननाम्याचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, की या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बॅट्समनने बोलून नाही तर कामाने करून दाखवला आहे. ही युवकांची फौज शिवसेना देत आहे. आधीच्या सरकारमध्ये केवळ घोटाळे झाले. आमच्या सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. जी लोकं थयथयाट करत आहेत यांना मतदान करू नका मग कोणाला मतदान करायचे? असा सवालही उपस्थित केला. त्याचबरोबर काँग्रेसच्या जाहीरनाम्याची त्यांनी खिल्ली उडवत म्हणाले, की देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असाल तर मग हे सगळं कशासाठी, देशाच्या सुरक्षेशी छेडछाड करणाऱ्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार असता कामा नये, देशद्रोहाचा खटला रद्द करणार सांगणाऱ्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार असता कामा नये हीच निवणुकीची खरी आचारसंहिता असेल असे सांगत भाषणाची सांगता केली.