ठाणे : पिकनिकसाठी मित्रांसोबत गेलेले दोन तरूण भातसा नदी पात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. सध्या नदीपात्रात बुडालेल्या तरूणांचा शोध घेतला जात आहे. कल्याण तालुक्यातील खडवलीजवळ असलेल्या नदीपात्रात ही घटना घडली आहे.
भातसा नदीत दोन युवक बुडाले; शोध सुरू - kalyan khadavali
कल्याण तालुक्यातील खडवलीजवळ असलेल्या नदीपात्रात ही घटना घडली आहे. बुडालेल्या दोन्ही तरुणांचा शोध कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे.
नदीपात्रात बुडालेल्या दोन्ही तरूणांचा शोध कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे. मोहम्मद महादिक मौनुद्दीन सय्यद(वय 30, रा. कल्याण नाका, भिवंडी) आणि मोहम्मद नाहिद अहमद शेख(वय 40, रा. नवीबस्ती ,भिवंडी) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. कल्याण तालुका पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
24 तासांपासून शोध मोहीम सुरू
शोध मोहीम सुरू
याविषयी सविस्तर वृत्त असे की, भिवंडीत राहणारे पाच मित्र पिकनिकसाठी खडवली नदीवर गेले होते. यावेळी हे सर्व मित्र अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असता त्यापैकी मोहम्मद महादिक मौनुद्दीन सय्यद आणि मोहम्मद नाहिद अहमद शेख या दोघांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यावेळी सोबतचे मित्र आणि स्थानिक नागरिकांना त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर कल्याण तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने त्यांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. या घटनेमुळे हे तरूण राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.