ठाणे : शेतात काम करत असताना दोन तरुणीसह एका महिलाच्या अंगावर वीज ( LIGHTNING STRIKE ) कोसळळी. या दुर्घटनेत २ तरुणीचा जागीच मृत्यू ( Two young women died due to lightning ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही दुर्देवी घटना भिवंडी तालुक्यातील पिसा - चिराड पाडा गावाच्या हद्दीत आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शितल अंकुश वाघे (वय १७) योगिता दिनेश वाघे (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणीची नावे आहेत. तर सुगंधा अंकुश वाघे (वय ४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
अंगावर वीज पडून दोन तरुणींचा मृत्यू; एक जण जखमी - lightning
शेतात काम करत असताना दोन तरुणीसह एका महिलाच्या अंगावर वीज ( LIGHTNING STRIKE ) कोसळळी. या दुर्घटनेत २ तरुणीचा जागीच मृत्यू ( Two young women died due to lightning ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
परतीच्या पावसानं भिवंडी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. त्यातच आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. यावेळी मृतक शीतल व तिची आई सुगंधा ह्या दोघी मायलेकी मृत योगिता सोबत शेतात काम करत होत्या. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. या घटनेचे माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही तरुणीचे मृत्यदेह पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरणीय तपासणी साठी नेण्यात आले. तर जखमी महिलेला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.