महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचऱ्याच्या डंपरचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात २ मजूर ठार तर सहाजण गंभीर जखमी - garbage truck accident at bhiwandi thane

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हे सर्व मजूर चहा पिण्यासाठी चमन हॉटेलबाहेर बाकड्यावर बसलेले होते. त्याचवेळी महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा डंपर (एमएच - ०४ - डीडी - ८४४३) डंपिंग ग्राऊंडवर कचरा खाली करून उतारावरून परतत असताना डंपरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर थेट हॉटेलच्या भिंतीवर जाऊन धडकला.

thane
कचऱ्याच्या डंपरचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात २ मजूर ठार तर सहाजण गंभीर जखमी

By

Published : Dec 18, 2019, 8:28 AM IST

ठाणे - भिवंडी शहर महानगरपालिकेच्या रामनगर, चावींद्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवरून कचराखाली करून परतणाऱ्या कचऱ्याच्या डंपरचा ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना चावींद्रा हद्दीतील चमन हॉटेलसमोर घडली आहे. शब्बीर उर्फ राजू खान (वय ४० ), अहमद हारून मोमीन (वय ३२) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे असून समीन खान (वय ४५), रामकुमार मौर्य (वय ४०), साजिद अली (वय २७), जमाल शेख (वय २७), मझहर खान (वय ५६) गुफरान अंसारी (वय २४) अशी या अपघातातील जखमी झालेल्या मजूरांची नावे आहेत.

कचऱ्याच्या डंपरचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात २ मजूर ठार तर सहाजण गंभीर जखमी

हेही वाचा -नवी मुंबई : वाशीमधून ८९ किलो गांजा हस्तगत, एकास ताब्यात

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हे सर्व मजूर चहा पिण्यासाठी चमन हॉटेलबाहेर बाकड्यावर बसलेले होते. त्याचवेळी महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा डंपर (एमएच - ०४ - डीडी - ८४४३) डंपिंग ग्राऊंडवर कचरा खाली करून उतारावरून परतत असताना डंपरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर थेट हॉटेलच्या भिंतीवर जाऊन धडकला. यावेळी हॉटेलच्या बाकड्यावर चहा पिण्यासाठी बसलेले मजूर डंपरच्या खाली चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभाीर जखमी झाले.

हेही वाचा -प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने भिवंडीत तरुणीची आत्महत्या

जखमींपैकी जमाल शेख आणि मझहर खान या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर समीन, साजिद आणि रामकुमार या तिघांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गुफरान याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून या अपघात प्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -धक्कादायक..! चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षक आणि दोन प्रियकरांचा अत्याचार

दरम्यान, भिवंडी शहर महानगरपालिकेत खाजगी ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने कचरा वाहतूकीसाठी मुदत बाह्य डंपर आणि ट्रक लावत आहेत. बहुतांश डंपरचे पासिंग, टॅक्स भरलेले नसतात. तर चालकांचे ड्रॉयव्हींग लायसन्स सुद्धा नाहीत, असे असतानाही डंपर कचरा वाहतुकीसाठी लावले जात आहेत. त्यामुळे असे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यापूर्वी देखील असाच अपघात होवून त्या अपघातात एक तरुणी ठार तर दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने कचरा वाहतुकीसाठी सुस्थितितील डंपर ठेवले पाहिजेत. तसेच अशा जुनाट वाहनांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भिवंडी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details