ठाणे - एकाच रात्रीत तब्बल १२ घरफोड्याकरून पसार झालेल्या चोरट्यांना ( Two Thieves Arrest By Kongaon Police ) कोनगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यांना नौपाडा पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. रवी उर्फ गानू तानाजी धनगर (१९) रा. आंबिवली, कल्याण आणि राज विजय राजापूरे (२१) रा. इंदोर मध्यप्रदेश, अशी घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते चोरटे -
कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन नाक्यावर व गावातील दुकानांना चोरट्यांनी लक्ष करीत १५ डिसेंबर रोजी एकाच रात्री डझनभर दुकानांचे शटर कशाने तरी उचकटून आत प्रवेश करत दुकानांतील गल्ल्यात असलेली रोकड आणि काही महागडे साहित्य लंपास केले. यामध्ये ५ मेडिकल, २ स्वीट मार्ट (मिठाईची दुकाने ) आणि २ इतर दुकानाचा समावेश आहे. तर तीन दुकानांचे शटर चोरटे उचकट असताना आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. घटनेच्या दिवशी अर्घ्यातासाने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्या चोरट्यांचा शोध सुरु केला होता. खळबळजनक बाब म्हणजे १५ डिसेंबरच्या पहाटे कोनगावात दुकाने फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ डिसेंबरला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ ते ७ दुकाने एकाच रात्री या चोरट्यांनी फोडली होती.