ठाणे - साडूच्या घरात त्याच्या वयोवृद्ध आई व्यतिरिक्त घरात कुणी नसल्याची माहिती काढली. त्यानंतर मित्रासोबत थेट उल्हासनगरहून मध्य प्रदेशातील इंदौर गाठून घरातील वयोवृद्ध महिलेला मारहाण करीत रोकड व दागिन्यांची जबरी चोरीचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील चोरट्या नातेवाईकासह त्याच्या साथीदाराला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने दोघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. मुकेश खूबचंदानी असे साडूच्या घरात डल्ला मारणाऱ्या नातेवाईकचे नाव आहे. तर आनंद कुशमंडल असे या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या चोरट्याचे नाव आहे.
कर्जबारी झाल्याने मित्राच्या मदतीने साधला होता चोरीचा डाव
इंदौरमध्ये अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडूची वयोवृद्ध आई विमल दास ही मुलगा व सून कामाला गेल्यावर घरी एकटीच राहत असल्याची माहिती उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आरोपी मुकेश खूबचंदानी याला होती. त्यातच मुकेश कर्जबाजारी असल्याने त्याने चोरी करण्याचे उद्देशाने डोंबिवली मधील खोणी फाटा येथे राहणाऱ्या आनंद कुशमंडल या मित्राला सोबत घेऊन बसने इंदौर गाठले. 9 तारखेला इंदौरला पोहचल्यावर तोंडाला रुमाल बांधून त्यांनी साडूच्या घरात प्रवेश केला व विमल दास यांना मारहाण करून व तोंड दाबून कपाटातील 51 हजार रुपये व दागिने घेऊन पुन्हा बसने पुन्हा उल्हासनगरात परत आले.
साडूच्या घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीचा डाव फसला - ulhasnagar news
साडूच्या घरात त्याच्या वयोवृद्ध आई व्यतिरिक्त घरात कुणी नसल्याची माहिती काढली. त्यानंतर मित्रासोबत थेट उल्हासनगरहून मध्य प्रदेशातील इंदौर गाठत चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या आधारे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.
साडूच्या घरातच मारला डल्ला पण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीचा डाव फसला
Last Updated : Dec 16, 2020, 1:37 AM IST