महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फिरायला गेलेल्या २ आयटीआय विद्यार्थ्यांचा भातसा नदीत बुडून मृत्यू - फिरायला गेलेल्या २ आयटीआय विद्यार्थ्यांचा भातसा नदीत बुडून मृत्यू

भातसा नदीवर सहलीसाठी आलेल्या 2 विद्यार्थ्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईहून कल्याण तालुक्यातील भातसा नदीवर आयटीआयचे शिक्षण घेत विद्यार्थी फिरायला आले होते. अक्षय बर्मे (वय 21, राहणार वडाळा) आणि कृष्णा धरणे (वय 19, राहणार जोगेश्वरी) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

अक्षय बर्मे, कृष्णा धरणे

By

Published : Nov 21, 2019, 8:47 PM IST

ठाणे -भातसा नदीवर सहलीसाठी आलेल्या 2 विद्यार्थ्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईहून कल्याण तालुक्यातील भातसा नदीवर आयटीआयचे शिक्षण घेत विद्यार्थी फिरायला आले होते. अक्षय बर्मे (वय 21, राहणार वडाळा) आणि कृष्णा धरणे (वय 19, राहणार जोगेश्वरी) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा -नालासोपाऱ्यात पालघर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन, 50 नायजेरियन नागरिक ताब्यात

कल्याण तालुक्यातील खडवली परिसरात असलेल्या भातसा नदीवर मुंबईतील आगरी पाडा येथील आयटीआय महाविद्यालयातील 11 विद्यार्थी फिरायला आले होते. खडवली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या भातसा नदीवर ते गुरुवारी दुपारच्या सुमारास आले. त्यांनतर सर्व मित्र कंपनी मौजमजा करीत असताना सर्वजण पोहायला नदी पात्रात उतरले. त्यावेळी अचानक नदीपात्रात भोवरा तयार झाला. यात कृष्णा या तरुणाला इतर मित्रांनी खोल पाण्यात जाऊ नको, असे बजावत असतानाही तो गेला आणि त्याचा पाण्याच्या भोवऱ्यात अडकून मृत्यू झाला आहे. त्याला वाचविण्यासाठी अक्षय मदतीला गेला असता, तोही पाण्यात बुडाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस व कल्याणाचे अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या 2 विद्यार्थ्यांच्या मृतेदहाची शोध मोहीम सुरू केली आहे. ही शोध मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. मात्र तरुणांच्या मृतदेहाचा शोध लागला नसल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कस्तुरे यांनी दिली.

हेही वाचा -नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र पुन्हा सुरू; कारंजातील 'पीएनबी'चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details