ठाणे -उपवन तलाव परिसरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघांना बिबट्याच्या कातडीसह जेरबंद करण्यात आले. नरेंद्र नामदेव गुरव (वय, 39 रा.आचिर्णे,वैभववाडी) आणि अजित अनंत मराठे (वय, 33 रा.पिंपळवाडी, कणकवली) अशी या दोघा तस्करांची नावे आहेत.
ठाण्यातील उपवन येथे बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक - बिबट्याच्या कातडीची तस्करी
ठाण्यातील उपवन परिसरात बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन दोघेजण येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार, वन अधिकारी पवार आणि वनरक्षकांनी उपवन तलाव परिसर आणि भू केंद्र बस स्टॉपजवळ सापळा रचला.
हेही वाचा - पाच वर्ष मागे गेलेल्या राज्याला पुढे आणण्यासाठी काम करायचे आहे - रोहित पवार
ठाण्यातील उपवन परिसरात बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन दोघेजण येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार, वन अधिकारी पवार आणि वनरक्षकांनी उपवन तलाव परिसर आणि भू केंद्र बस स्टॉपजवळ सापळा रचला. बिबट्याच्या कातडीसह आलेल्या दोघाही तस्करांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या विरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती येऊर परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.