ठाणे - निष्काळजीपणे गाडी चालवून श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडल्याची संतापजनक घटना घडली. कल्याण पश्चिमेकडे खडकपाडा परिसरात हा प्रकार समोर आला. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे फरार वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ : ठाण्यात श्वानाच्या पिल्लांना गाडीखाली चिरडले; चालक फरार - श्वानाच्या पिल्लांना चिरडले
खडकपाड्यातील माधवसृष्टी सोसायटीच्या आवारात एका कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडले. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे.
सीसीटीव्हीत चित्रीत झालेली पिल्ले
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपाली ७ वर्षांची सक्तमजुरी
खडकपाड्यातील माधवसृष्टी सोसायटीच्या आवारात एका कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून श्वानाच्या दोन पिल्लांना चिरडले. या अपघातात ही दोन्ही पिल्ले जागीच मरण पावली. पोलीस फरार कार चालकाचा शोध घेत आहेत.