ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांची व्यवस्था कारागृहाबाहेरच करण्याच्या निर्णय आधारवाडी कारागृह प्रशासनाने घेतला. नवीन कैद्यांना याच परिसरातील डॉन बॉस्को शाळेत धाडले जात होते. या शाळेला चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. मात्र याच शाळेतून गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले दोन कैदी चक्क हॉलच्या मागील बाजूस असलेले प्लायवूड तोडून पसार झाल्याने कारागृह प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. उमेश जाधव व गणेश उर्फ गणपत दराडे अशी या पसार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.
कल्याणच्या डॉन बॉस्को शाळेतून दोन कैदी पसार; कारागृह प्रशासनामध्ये खळबळ - कल्याणच्या विलगीकरण कक्षातून कैदी फरार बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारवाडी कारागृह प्रशासनाने नव्या कैद्यांना याच परिसरातील डॉन बॉस्को शाळेत क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली. मात्र, याच क्वारंटाईन सेंटरमधून 2 कैदी फरार झाल्याने कारागृह प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.
कल्याणच्या या कारागृहात 540 कैद्यांना सामावून घेण्याची क्षमता असताना त्यात तिप्पट म्हणजेच जवळपास दीड हजार कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. हे कारागृह ओव्हरलोड झाल्याने नव्याने येणाऱ्या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठवले जात आहे. त्याचबरोबर कारागृहाची दुरुस्ती व विस्तारीकरणाचा प्रस्तावही लालफितीत अडकल्याने कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना कोरोनाची दहशत चार भिंतीत शिक्षा भोगणाऱ्या कच्च्या-पक्क्या कैद्यांमध्येही पसरली आहे. कारागृहातील अस्वच्छ वातावरणामुळे तेथील कैदी भयभीत झाले आहेत. त्यासाठी प्रशासनाने नव्या कैद्यांची त्याच परिसरातील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था केली आहे. या शाळेच्या भोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच क्वारंटाईन सेंटरमधून गंभीर गुन्ह्यातील 2 कैदी फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीने भरलेल्या आधारवाडी कारागृहातील काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली. असे असले तरी अद्याप हजारो कैदी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, डॉन बॉस्को शाळेतून गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले दोन कैदी चक्क हॉलच्या मागील बाजूस असलेले प्लायवूड तोडून पसार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.