ठाणे- येथील शासकीय रुग्णालय पूर्णतः कोव्हिड-19 रुग्णालय असून याच रुग्णालयात दाखल असलेले वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करत क्वारंटाईन सेंटरमधून परतलेल्या या दोघा कोरोना योद्धयांवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या राहत्या निवासस्थानीही दोघांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
ठाणे : सिव्हिल रुग्णालयात दोन पोलीस कोरोनामुक्त, पुष्पवृष्टीने निवासस्थानी स्वागत - नाईक संदीप ठाणगे
वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करत क्वारंटाईन सेंटरमधून परतलेल्या या दोघा कोरोना योद्धयांवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या राहत्या निवासस्थानीही दोघांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
वर्तकनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप ठाणगे आणि पोलीस शिपाई चालक महेश हिवरे यांचे 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघांनाही कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे दिसून न आल्याने त्यांना ठाणे महापालिकेच्या भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. 30 एप्रिल रोजी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 3 मे) भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटरमधून मुक्त करण्यात आले. या दोघांचेही क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडताना तसेच, त्यांच्या राहत्या ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
हेही वाचा -भिवंडीहून गोरखपूर पाठोपाठ जयपूरला जाणारी विशेष श्रमिक ट्रेन कामगारांना घेऊन रवाना