ठाणे:सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'एनआयए'च्या पथकाने सोमवारी पहाटेच्या साडेचार वाजल्याच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Anti ISIS operation In Bhiwandi) हद्दीत एका खोलीवर अचानक धाड टाकली होती. (two ISIS supporters arrested) या धाडी दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला हे दोघे अनेक दिवसापासून याच भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. (NIA raid in Padgha Borivali) तर याच दिवशी मुंबईतील नागपाडा परिसरातून ताबीश नासेर सिद्दीकी याला अटक केली. यासह पुणे शहरातील कोंढवा भागातून जुबेर नूर मोहम्मद शेख अबू नुसैबा याला अटक केली आहे.
शस्त्र बनविण्याचे घेतले प्रशिक्षण :माहितीनुसार, 'एनआयए' अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेल्या चारही जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. या चौघांनी 'आरडीएक्स' आणि शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण तरुणांना दिले असून आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती. ज्यात 'आयईडी' बनवणे आणि लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे, आदी माहिती होती. त्याशिवाय, त्यांच्या परदेशस्थित 'आयसीस' या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी 'व्हॉईस ऑफ हिंद' या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही 'एनआयए'ने म्हटले आहे. (two ISIS supporters arrested) शरजील शेख (वय ३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (वय ३६) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. (NIA raid in Padgha Borivali) विशेष म्हणजे एकाच दिवशी पहाटेच्या सुमारास मुंबई, ठाणे आणि भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली या तीन ठिकाणी छापेमारीत करत चार जणांना आतापर्यंत 'एनआयए'च्या पथकाने अटक केली आहे.