ठाणे - कोपर-ठाकुर्ली स्थानकाजवळ गर्दीच्या रेट्यामुळे लोकलमधून पडून एका विद्यार्थ्यासह वेटरचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना लागोपाठ घडल्या. जयेश विठ्ठल कुडव (वय-19, विद्यार्थी) आणि संतोष किर्ती कोहली (वय-27, वेटर) अशी मृतांची नावे आहेत.
मृत जयेश याने ठाण्यातून आसनगाकडे जाणारी लोकल पकडली. यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. कोपर स्थानकाजवळ तोल जाऊन तो लोकलबाहेर फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेश हा शहापूर तालुक्यातील मुसई (शेणवे) गावचा रहिवासी आहे. तो दिवा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.