महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूर धरणामध्ये बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

होळी दिवशी गुरुवारी सायंकाळी बदलापूर बॅरेज धरणामध्ये ३ तरुण पोहायला गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते धरणात बुडाले. या ३ तरुणांपैकी दोघांचे मृतदेह आज सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.

मृत तरुण

By

Published : Mar 22, 2019, 11:51 PM IST

ठाणे - बदलापूर बॅरेज धरणामध्ये बुडालेल्या ३ तरुणांपैकी दोघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात अग्निशामकदलाला यश आले आहे. तर एका तरुणाचा अद्यापही शोध सुरू आहे.

बदलापूर बॅरेज धरण

बदलापूरच्या कात्रप भागातराहणारे कल्पेश चौधरी, कार्तिक लाडी आणि उल्हासनगरचे नितीन गाडेकर हे तिघे मित्रांसोबत होळी खेळून गुरुवारी सायंकाळी बदलापूर बॅरेज धरणामध्ये अंघोळीला गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, अशी माहिती त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी दिली.

घटनेनंतर याची माहिती बदलापूर अग्निशामकदलाला आणि पोलिसांना देण्यात आली. यानंतर अग्निशामकदलाने रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, या तरुणांचा पत्ता लागला नाही. आज सकाळी पुन्हा या तरुणांचा शोध घेतल्यावर कल्पेश आणि नितीनचा मृतदेह अग्निशामक दलाने नदी पात्रातून बाहेर काढला. मात्र, अद्यापही कार्तिकचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे दरवर्षी होळी सणात येथे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील प्रशासनाकडून याठिकाणी प्रवेशबंदी का केली जात नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details