ठाणे : कल्याण-डोंबिवलीमध्ये आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 21वर पोहचला आहे. कल्याण पश्चिमेत एक आणि डोंबिवली पूर्वेत एक असे 2 रुग्ण शुक्रवारी आढळून आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. तर दुसरीकडे 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत आणखी 2 कोरोनाग्रस्त; एकूण संख्या 21वर - thane corona patient
दिवसेंदिवस कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 21 रुग्ण आढळले असून, त्यापैकी कल्याण शहरातील 8 तर डोंबिवलीतील तब्बल 13 जणांचा समावेश आहे.
दिवसेंदिवस कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 21 रुग्ण आढळले असून, त्यापैकी कल्याण शहरातील 8 तर डोंबिवलीतील तब्बल 13 जणांचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेत आढळून आलेला आजचा कोरोनाचा दुसरा रुग्ण आहे. या सर्वांवर रूग्णालयात उपचार सुरू असून, कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने डोंबिवली पाठोपाठ कल्याणातही खाजगी वाहनांवर बंदी आणली आहे.
दरम्यान, कल्याण आणि डोंबिवलीत रुग्णांची वाढत असणारी संख्या पाहता आता तरी नागरिक जागे होतील का? सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्याने पालन करतील का? शासकीय यंत्रणाना आपली खरी माहिती देतील का? असे अनेक प्रश्न कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यामुळे निर्माण झाले आहेत.