महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस असल्याचा बहाणा करत वयोवृद्ध महिलेचे दागिने लंपास - gold jewelry

२ भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगू एका वृद्ध महिलेजवळील सोन्याचे दागिने काढून घेत पळ काढला.

thane
वयोवृद्ध महिलेचे दागिने केले लंपास

By

Published : Dec 17, 2019, 11:43 AM IST

ठाणे -शिवगंगानगर परिसरात २ भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून हातचलाखीने एका वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. रजनी होतवाणी (वय ६६) असे फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

हेही वाचा -जामिया विद्यापीठातील लाठीमारच्या निषेधार्थ कल्याणमध्ये आंदोलन; विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगानगर परिसरात रजनी होतवाणी राहतात. त्या उल्हासनगरातील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय येथे सत्संगसाठी गेल्या होत्या. सत्संग संपवून त्या रिक्षाने घरी जाण्याकरता निघाल्या. शिवमंदीर कानसई नाल्यावरील पूल ओलांडल्यावर शिवगंगाकडे जाणाऱ्या रोडजवळ उतरून त्या पायी घरी जात होत्या. यावेळी बौद्ध विहाराजवळ उभ्या असलेल्या २ अनोळखी भामट्यांनी रजनी यांना वाटेत अडवले. त्यांनी रजनी यांना आपण पोलीस असल्याचे सांगितले आणि येथे खून झाला आहे असे बोलून बाजूला नेले. नंतर, रजनी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील सोन्याच्या बांगड्या या बॅगेत काढून ठेवा असा बहाणा करत हातचलाखीने ते दागिने लंपास केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्या २ अनोळखी भामट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

हेही वाचा - उल्लेखनीय..! कचऱ्यात जाणाऱ्या पादत्राणांवर प्रक्रिया करून गोरगरिबांना मोफत वाटप...

ABOUT THE AUTHOR

...view details