ठाणे :अनेक ठिकाणी धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. तर धबधब्याच्या कुंडात दोन मित्राचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील खोर गावच्या हद्दीत असलेल्या कुंडात घडली आहे. मात्र त्याच्यासोबत असलेली मैत्रीण बचावली असल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कार्तिक नागभूषण रेड्डी - पाटील (वय, २२, रा. आंध्रप्रदेश ) धनंजय दत्तात्रये गायकवाड ( वय ३०, रा. मुरबाड) असे दोन्ही मृतक मित्राची नावे आहेत.
तोल जाऊन पाण्याचा कुंडात पडले: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक कार्तिक आणि धनंजय हे दोघे आज ( मंगळवार) सायंकाळच्या सुमारास कल्याण तालुकयातील कोलम गावात राहणाऱ्या २२ वर्षीय मैत्रिणी सोबत सहलीसाठी आले होते. त्यावेळी शहापूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील माऊली गडाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या कुंडाजवळ आले होते. त्याच वेळी मृतक कार्तिक याचा तोल जाऊन तो पाण्याचा कुंडात पडला होता. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी धनंजयनेही कुंडात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रत्यन केला. मात्र दोघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिली आहे.