महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रांगोळी पुसल्याच्या संशयातून 'सख्खे शेजारी झाले पक्के वैरी'; घटना सीसीटीव्हीत कैद - भिवंडी पोलीस ठाणे

विशेष म्हणजे दोघा शेजाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे आणि पाप्पनवर अशी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाची नावे आहेत.

thane crime news
रांगोळी पुसल्याच्या संशयातून 'सख्खे शेजारी झाले पक्के वैरी'

By

Published : Jan 18, 2020, 4:52 PM IST

Updated : Jan 18, 2020, 5:07 PM IST

ठाणे- दारासमोर काढलेली रांगोळी पुसल्याच्या संशयातून दोघे 'सख्खे शेजारी पक्के वैरी' झाल्याची घटना घडली. ही घटना भिवंडी शहरातील श्रमिकनगर येथील एका इमारतीत घडली.

हेही वाचा -नवी मुंबईत 2019 मध्ये महिला अत्याचारात वाढ; १६९ बलात्काराचे गुन्हे दाखल

विशेष म्हणजे दोघा शेजाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे आणि पाप्पनवर अशी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाची नावे आहेत.

भिवंडीत रांगोळी पुसल्याच्या संशयातून 'सख्खे शेजारी झाले पक्के वैरी'

भिवंडी शहरातील मानसरोवर परिसरात श्रमिकनगरमधील एका इमारतीमध्ये वानखेडे आणि पाप्पनवर हे दोन्ही कुटुंबीय शेजारी राहतात. वानखेडे कुटुंबातील महिलेने दारासमोर रांगोळी काढली होती. ही रांगोळी शेजाऱ्याने पुसल्याच्या संशयातून भांडण झाले. या भांडणात शेजारी घरातील वानखेडे कुटुंबाने पाप्पनवर कुटुंबातील पती-पत्नीस मारहाण करत पत्नी सविता यांच्या हाताला कडाडून चावा घेतला.

हेही वाचा -'तो' व्हिडिओ अर्धवट, कायदेशीर कारवाई करणार - नगरसेवक चव्हाण

या मारहाणीची घटना इमारतीमधील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर, मारहाण झालेल्या सविता पाप्पनवर यांनी भिवंडी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Last Updated : Jan 18, 2020, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details