मीरा भाईंदर (ठाणे) : घर दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला पत्रकार असल्याचे सांगून वीस हजाराची खंडणी (fake journalists extortion case) मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी रंगेहात हात अटक (fake journalists arrested) केली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात आरोपी अरविंद राजभर राहुल सिंग यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल (extortion case on Fake journalist) करण्यात आला आहे. latest news from Thane, Thane Crime
Two Fake Journalists Arrested: दोन तोतया पत्रकारांना खंडणी प्रकरणी भाईंदर पोलिसांनी केली अटक - Thane Crime
पत्रकार असल्याचे सांगून वीस हजाराची खंडणी (fake journalists extortion case) मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी रंगेहात हात अटक (fake journalists arrested) केली आहे. आरोपी अरविंद राजभर राहुल सिंग यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल (extortion case on Fake journalist) करण्यात आला आहे. latest news from Thane, Thane Crime
![Two Fake Journalists Arrested: दोन तोतया पत्रकारांना खंडणी प्रकरणी भाईंदर पोलिसांनी केली अटक Two Fake Journalists Arrested](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16991156-thumbnail-3x2-accusedarrest.jpg)
बोगस पत्रकारांची वाढती संख्या चिंताजनक -वाढत्या बोगस पत्रकारांची संख्या पाहता मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयमध्ये पोलिसांकडून खंडणी उकळणाऱ्या पत्रकारांवर कारवाई करताना दिसत आहे. या अगोदर देखील भाईंदर पोलीस ठाण्यात दोन तोतया पत्रकार यांना अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी तक्रारदार परवेज खान यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी शिवसेना गल्लीमध्ये सापळा रचून वीस हजारची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना चार हजार मध्ये तडजोड करून पैसे देताना ताब्यात घेतले आहे.
धमकी देत खंडाळी उकळण्याचा प्रयत्न -या प्रकरणी तक्रारदार यांच्या तक्रारीवरून "आप मुझे पैसे दो अन्यथा आपका घर तोड देंगे'', अशा प्रकारची धमकी देत खंडाळी उकळण्याचा प्रयत्न करत होते. तक्रारदार परवेस खान यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. अखेर भाईंदर पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक करून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास भाईंदर पोलीस करत आहे.