महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यात पडून दोन वयोवृद्ध गंभीर जखमी

कल्याण पश्चिमेतील सिद्धेश्वर आळी हे गणेश सहस्त्रबुद्धे हे काल सकाळी दुकानात दुध आणण्यासाठी गेले असता ते सुद्धा टिळक चौकातील खड्डय़ात पडून जखमी झाले आहे. त्यांच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले आहे. त्यांच्यावरही देखील खाजगी रुग्णलायत उपचार सुरू आहेत.

two elderly persons were seriously injured after falling into a ditch in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यात पडून दोन वयोवृद्ध गंभीर जखमी

By

Published : Jul 7, 2022, 10:36 PM IST

Updated : Jul 7, 2022, 10:48 PM IST

ठाणे : तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पडललेल्या खड्यामुळे कल्याण डोंबिवली शहरात ५ जणांचा खड्याने बळी घेतला होता. त्यावेळी महापालिका प्रशासनावर सर्वच स्तरातून सडकून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्याची दुरुस्ती केली होती. आता मात्र पुन्हा शहरात खड्ड्याने डोकेवर काढल्याचे दिसून येत असतानाच रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याचा अंदाज न आल्याने दोन वयोवृद्ध व्यक्ती पडून गंभीर जखमी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली. रवींद्र उपेंद्र पै (५८), गणेश सहस्त्रबुध्दे (७१) अशी खड्ड्यात पडून गंभीर दुखापती झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत.

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यात पडून दोन वयोवृद्ध गंभीर जखमी
संध्याकाळी फिरताना पडले खड्ड्यात - दोन्ही ज्येष्ठ नागरिक कल्याण पश्चिम भागातील टिळक चौक परिसरात राहतात. रवींद्र पै सनदी लेखापाल आहेत. ते नेहमीप्रमाणे काल संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी पाऊस पडत असतानाच टिळक चौकात रस्त्यावरील एका खड्ड्यात पाणी तुंबले होते. या पाण्यातून जात असताना रवींद्र यांचा पाय एका खड्ड्यात पडून मुरगळला. ते बेसावधपणे रस्त्यावर पडले. पडताना हात अंगाखाली आल्याने त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. त्यांच्या हातावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे. महापालिका नागरी सोयी कधी देणार - याबाबत रवींद्र पै यांनी महापालिका नागरिकांकडून कर वसूल करते, मात्र नागरी सोयी कधी देणार. नागरिकांनी किती भोगायचे. केवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पॅच करुन निघून जात असल्याने त्या खड्यात पाणी साचून असे अपघात घडत आहे. अशी माहिती सनदी लेखापाल रवींद्र पै यांनी दिली. कल्याण पश्चिमेतील सिद्धेश्वर आळी हे गणेश सहस्त्रबुद्धे हे काल सकाळी दुकानात दुध आणण्यासाठी गेले असता ते सुद्धा टिळक चौकातील खड्डय़ात पडून जखमी झाले आहे. त्यांच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले आहे. त्यांच्यावरही देखील खाजगी रुग्णलायत उपचार सुरू आहेत.
Last Updated : Jul 7, 2022, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details