महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palm Wine : ताडी पिऊन दोघा तरुणांचा मृत्यू; ठाण्यातील दुकानमालक फरार - palm wine shop owner case file thane

ताडी पिऊन दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिम भागातील कोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या ताडीच्या दुकानात घडली. गुन्हा दाखल होताच ताडीच्या दुकानाचा मालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Two dies after taken palm wine in thane, case registered
ताडी पिऊन दोघा तरुणांचा मृत्यू

By

Published : Jan 11, 2022, 5:22 PM IST

Updated : Jan 11, 2022, 5:37 PM IST

ठाणे - ताडी पिऊन दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Two dies after taken palm wine ) ही घटना डोंबिवली पश्चिम भागातील ( Dombivali west ) कोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या ताडीच्या दुकानात घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात ( Vishnunagar police station ) ताडीच्या दुकान मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील चोळके (28) आणि सचिन पाडमुख( 22)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

प्रतिक्रिया

दोघेही भोवळ येऊन पडले होते रस्त्यावर -

मृत दोघेही काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या एका ताडीच्या दुकानात चार मित्रांसह ताडी पिण्यासाठी गेले होते. चारपैकी २ मित्रांनी आदी दुकानातील ताडी पिऊन घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी रस्त्यातच भोवळ येऊन दोघेही जमिनीवर पडले होते. हे पाहून मित्र त्यांच्या मदतीला धावून येत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये डोंबिवली वाहतूक पोलीसमध्ये वॉर्डन पदावर स्वप्नील चोळके हा कार्यरत होता. विशेष म्हणजे या दोघांच्या घटनेची माहिती मिळताच मृतक इतर मित्रांनी ताडी न पिताच दुकानातून बाहेर पडल्याने ते बचावले आहेत.

हेही वाचा -Third Wave of Corona : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झाली सुरुवात - आरोग्यमंत्री टोपे

भाजप आमदारांचा खळबळजनक आरोप -

ठाणे जिल्ह्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात ताडाची झाडे होती. मात्र, कालातंराने सिमेंटची जंगले चोहीकडे उभी राहिल्याने त्यामध्ये शेकडो ताडीच्या झाडांची कत्तल केली गेल्याचा आरोप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. तसेच जिल्ह्यात शेकडो ताडीची दुकाने असून बहुतांश ताडी दुकानादार ग्राहकांना नशा येण्यासाठी ताडीमध्ये केमिकल जास्त प्रमाणामध्ये मिश्रित करीत असतात. त्यामुळेच या दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोपही आमदार रवींद्र चव्हाण केला आहे. तर गुन्हा दाखल होताच ताडीच्या दुकानाचा मालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Last Updated : Jan 11, 2022, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details