महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत पोलीस हवलदारासह एकाचा मृत्यू

शेणवे रस्त्यावर शूलोत्तर गावानजीक दोन दुचाक्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन २ जणांचा मृत्यू झाला.

मृत उघडे आणि हरड

By

Published : Oct 13, 2019, 4:24 PM IST

ठाणे- शेणवे रस्त्यावर शूलोत्तर गावानजीक दोन दुचाक्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन २ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पोलीस हवालदारासह एका दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. विजय उघडे असे पोलीस हवलदाराचे नाव असून ते किन्हवली पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत होते. तर विकास हरड असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे.

हेही वाचा - ठाण्यात रन फॉर व्होट मॅरेथॅान; मतदार जागृतीसाठी धावले ठाणेकर

पोलीस हवालदार शनिवारी रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शहापूर-शेणवे रस्त्यावर शूलोत्तर गावानजीक तरुण विकास हरड हा दुचाकीने जात होता. त्याच दरम्यान पोलीस हवालदार उघडे व विकास हरड यांच्या दुचाक्या समोरासमोर जोरदार धडकल्या. या अपघात तिघांच्या डोक्याला, छातीला जबरी मार लागला असून एकाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, अपघात इतका भीषण होता. उपचासासाठी नेत असतानाच रस्त्यातच विकास हरड व पोलीस हवालदार विजय उघडे यांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा - इतर पक्ष बंडखोरीने पोखरले, आपलं मात्र ठणठणीत चाललयं - राज ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details