ठाणे -भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने राबोडीजवळील साकेत रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात त्याच दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची ( Two Died in a Road Accident ) घटना बुधवारी (दि. 13 एप्रिल) घडली. कृष्णतराव पाटील ( वय 41 वर्षे), उमेश पाटील (वय 43 वर्षे, दोघे रा. घणसोली, नवी मुंबई), अशी मृतांची नावे आहेत.
Two Died in a Road Accident : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात, दोघांचा मृत्यू - .राबोडी पोलीस
भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने राबोडीजवळील साकेत रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात त्याच दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची ( Two Died in a Road Accident ) घटना बुधवारी (दि. 13 एप्रिल) घडली. कृष्णतराव पाटील ( वय 41 वर्षे), उमेश पाटील (वय 43 वर्षे, दोघे रा. घणसोली, नवी मुंबई), अशी मृतांची नावे आहेत.
राबोडी जवळील साकेत रस्त्याकडून क्रिक नाक्याकडे दोघेही दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात होते. त्यावेळी अचानाक दुचाकीवरील नियंत्रण सुटला. यामुळे दुचाकी घसरून रस्त्यावरील दुभाजकाला धडकून वीजेच्या खांबाला धडकली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. त्यांनी मद्य प्राशन केले होते की नाही याचा खुलासा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर होईल, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
हेही वाचा -बारबालाच्या डोक्यात फोडली दुसऱ्या बारबालांनी बियरची बाटली; बारबाला गंभीर