महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

नाशिक-मुंबई महामार्गावरील ट्रक व दुचाकी अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. महामार्गावर मुंबईच्या दिशेने ट्रक भरधाव वेगाने जात असताना शहापूर तालुक्यातील वेहलोली गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघात दुचाकीस्वार व ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. पप्पू दशरथ भोईर (वय 22 वर्षे, रा. वेळूक, कसारा), असे जागीच दुचाकीस्वाराचे नाव असून विलास पाटील (रा. जळगाव) हा ट्रक चालकही जागीच ठार झाला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : Nov 3, 2021, 10:25 PM IST

ठाणे - नाशिक-मुंबई महामार्गावरील ट्रक व दुचाकी अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. महामार्गावर मुंबईच्या दिशेने ट्रक भरधाव वेगाने जात असताना शहापूर तालुक्यातील वेहलोली गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघात दुचाकीस्वार व ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. पप्पू दशरथ भोईर (वय 22 वर्षे, रा. वेळूक, कसारा), असे जागीच दुचाकीस्वाराचे नाव असून विलास पाटील (रा. जळगाव) हा ट्रक चालकही जागीच ठार झाला आहे.

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात...

आज सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने (एम एच 04 सीवाय 4304) हा ट्रक भरधाव वेगात जात होता. त्यावेळी सकाळी 7 वाजून 45 मिनिटाने ट्रकचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि महामार्गावरून कल्याणकडे जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार पप्पू दशरथ भोईर याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या सोबतचा सहकारी गंभीर जखमी झाला. याचबरोबर, दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक काही अंतरावर जाऊन महामार्गालगतच्या खड्ड्यात उलटला. त्यात ट्रकमधील साहित्याखाली दबून ट्रक चालक विलास पाटील याचाही मृत्यू झाला. तर ट्रकमधील आणखी एकजण जखमी झाला.

जखमीवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू...

या अपघातची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जमखींना शहापूर उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हे ही वाचा -ठाण्यात 15 हजार रुपये किलोच्या सुवर्ण मिठाईला नागरिकांची पसंती

ABOUT THE AUTHOR

...view details