ठाणे- ठाणे महानगपालिकेचे कळवा स्थित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेहमीच गडबड घोटाळा होत असल्याचे आढळून आले आहे. आता पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. येथील दोन कोरोनाबाधित रुग्णांनी पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाण्यातील कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्ण पळाले
दोन्ही रुग्णांचा पत्ता प्रशासनाकडे असून एक रुग्ण भिवंडी येथे राहणारा आहे, तर दुसरा कोपरखैरने येथे राहणारा आहे. त्या दोन्ही ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती दिली असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.
दोन रुग्णांना कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही रुग्णांनी कोणालाही काही न सांगता तेथून पळ काढला. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी देखील ही घटना घडल्याचे मान्य केले असून या दोघांचा तपास पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या रुग्णांचा पत्ता प्रशासनाकडे असून एक रुग्ण भिवंडी येथे राहणारा आहे, तर दुसरा कोपरखैरने येथे राहणारा आहे. त्या दोन्ही ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती दिली असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. रुग्ण पळून गेल्यानंतर पालिका प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा चोख केली असल्याचे सांगितले असून वाढीव सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.