ठाणे - ऐरोलीमार्गे तुर्भे यार्डात जाणाऱ्या मालगाडीचे इंजिनजवळील दोन डब्बे रुळावरून खाली घसरले. शनिवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ऐरोली-रबाळे दरम्यान ही घटना घडली.
ठाण्यात मालगाडीचे डब्बे घसरले, लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही - ठाणे लेटेस्ट न्युज
लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, मालगाड्या सुरू आहेत. आज दुपारी ऐरोलीमार्गे मालगाडी जात असताना दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले. मात्र, इतर रेल्वेसेवा बंद असल्याने वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही.
ठाण्यात मालगाडीचे डब्बे घसरले, लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही
लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, मालगाड्या सुरू आहेत. आज दुपारी ऐरोलीमार्गे मालगाडी जात असताना दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले. मात्र, इतर रेल्वेसेवा बंद असल्याने वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही. सध्या रेल्वे प्रशासनाकडून गाडी रुळावर आणण्याचे काम सुरू असून या मालगाडीमध्ये कोणतीही जीवनावश्यक वस्तू नव्हत्या, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.