ठाणे - भिवंडी शहरातील अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कुल आणि आयेशा सिद्दीकी गर्ल्स उर्दू हायस्कुलमधील दोन लिपिकांना ९ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघा लाचखोरांना अटक केली आहे. तेहसीन मोहिद अहमद मोमीन (३६) आणि अकील मलिक शेख (५२) असे लाच स्वीकारतांना रंगेहात पकडलेल्या लिपिकांची नावे आहेत.
Bhiwandi Bribe News : भिवंडी उर्दू शाळेच्या २ लिपिकांस लाच घेताना अटक - भिवंडी उर्दू शाळा लिपिक लाच
भिवंडी शहरातील अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कुल आणि आयेशा सिद्दीकी गर्ल्स उर्दू हायस्कुलमधील दोन लिपिकांना ९ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघा लाचखोरांना अटक केली आहे.
ज्युनियर के.जी. मध्ये प्रवेश देण्यासाठी लाचेची मागणी -लाचखोर दोघांनी तक्रारदार रेहान मोहम्मद इसाहक अन्सारी(४३) यांच्या भावाच्या मुलीकडून ज्युनियर के.जी. च्या वर्गात प्रवेश देण्याकरिता लाचेच्या स्वरूपात ९ हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात अन्सारी यांनी नवी मुंबई लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला असता मंगळवारी दुपारच्या सुमारास लाच लुचपत विभागाने भिवंडी शहरातील नागाव येथील सलामतपुरा आयेशा सिद्दीकी गर्ल्स उर्दू शाळेत लाचखोरांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला होता.
त्यावेळी लाचखोर लिपिक तेहसीन व अकील या दोघांनी तक्रारदार यांच्याकडून ९ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. आज दोन्ही लाचखोर लिपिकांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास नवी मुंबई अँटी करप्शन ब्यूरो शाखेच्या महिला पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख करीत आहेत.