महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करणाऱ्या दोघा भावांना जेलची हवा - ठाणे गुन्हे बातमी

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्या शिवीगाळ करणाऱ्या दोघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ

By

Published : Mar 2, 2021, 3:25 PM IST

Updated : Mar 2, 2021, 4:28 PM IST

ठाणे - कोरोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस पुन्हा रस्त्यावर विना माक्स फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यातच मास्कबाबत एका तरुणाला विचारणारा करणाऱ्या पोलिसाला भर रस्त्यात शिवीगाळ करून धक्काबुकी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं-4 परिसरातील श्रीराम चौकात घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा भावांना अटक केली आहे. आशिष व आकाश त्रिपाठी (रा. प्रभुरामनगर कोळसेवाडी) असे पोलिसांना शिवीगाळ करून धक्कबुकी करणाऱ्या आरोपी भावांची नावे आहेत.

बोलताना पोलीस निरीक्षक

दोघांचीही कारागृहात रवानगी

जिल्ह्यातील विविध शहरात शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य चौकासह अन्य ठिकाणी स्थानिक महापालिका पथक व पोलीस विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. अशाच कारवाई दरम्यान उल्हासनगरमधील कॅम्प नं-4 श्रीराम चौकात विना मास्क जाणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी हटकले. यामुळे तो तरुण संतप्त होऊन पोलिसाला जाब विचारण्यासाठी घरी जाऊन भावाला घेऊन आला. दोघे भावांनी पोलिसाला विना मास्क जाताना का हटकले ? याचा जाब विचारून पोलिसांना भर भरस्त्यातच शिवीगाळ केली. याप्रकारचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या आशिष व आकाश त्रिपाठी या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलीस व महापालिका पथकाने नागरिकां सोबत उद्धटपणे वागण्या ऐवजी सहानुभूतीपूर्वक वागावे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -भिवंडीत लाकडाच्या कारखान्याला भीषण आग

Last Updated : Mar 2, 2021, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details