ठाणे - कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा अपघातात मृत्यू झाला. विटांच्या भरलेल्या भरधाव ट्रकने भरधाव वेगाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे घडली. विश्वास लिकऱ्या भोईर (वय ४२) व निळकंठ भोईर (वय ३२ ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
विश्वास आणि नीळकंठ हे दोघे भाऊ रेती काढण्याचे काम करीत होते. मात्र सद्या रेती उत्खननावर शासनाचे कडक निर्बंध असल्याने ते दोघेही गोदामांमध्ये माल उतरविण्याचे काम करीत होते. आज दुपारच्या सुमाराला या दोघा भावांना इंडियन कंपाऊंडच्या गोदामातून ट्रक रिकामा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे ते दोघे भाऊ मोटारसायकलवरून गोदामात जाण्यासाठी निघाले होते.