महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News : पाणी कनेक्शनच्या वादातून बाप-लेकाला मारहाण; हल्लेखोर फरार - Vitthalwadi Police Station

पाणी कनेक्शन घेण्यावरून झालेल्या वादातून बाप लेकाला बेदम मारहाण करून त्यांची डोके फोडल्याची घटना समोर आली ( Two Beaten For Minor Reasons Thane ) आहे. हा प्रकार उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात घडला आहे.

आरोपी कैलास भंडारी
आरोपी कैलास भंडारी

By

Published : Apr 10, 2022, 8:56 PM IST

ठाणे -पाणी कनेक्शन घेण्यावरून झालेल्या वादातून बाप लेकाला बेदम मारहाण करून त्यांची डोके फोडल्याची घटना समोर आली ( Two Beaten For Minor Reasons Thane ) आहे. हा प्रकार उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी हल्लेखोर विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा ( Vitthalwadi Police Station ) दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कैलास भंडारी असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे.

जखमी चंदन नेवरकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

गैरसमजुतीतून घडली घटना -उल्हासनगर मधील सुभाष टेकडीच्या डिफेन्स कॉलनी परिसरात जखमी चंदन नेवरकर यांचे कुटुंब राहते. त्यांच्याच शेजारी कैलास भंडारी यांचे कुटुंब आहे. या परिसरातील रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यामुळे तेथील पाण्याच्या पाईपलाईन उघड्या पडल्या आहे. त्याच पाईपलाईमधून कैलाश भंडारी हा पाणी कनेक्शन लाईन घेत होता. तेव्हा घटनास्थळी नेवरकर कुटुंबातील सदस्यांशी किरकोळ वाद झाले. परंतु, कैलास भंडारीने गैरसमज करून घेत वाद अधिक वाढवला.

आरोपी फरार -या वादातून आरोपी कैलास याने चंदन आणि श्रीधर या बाप लेकाला बेदम मारहाण करत डोके फोडत त्यांना रक्त बंबाळ केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी कैलास भंडारी विरोधात मारहाण ,तोडफोड ,शिवीगाळ आणि धमकावणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण आरोपी कैलासला लागताच तो फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे. कैलास हा राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कारवर चालक आहे.

हेही वाचा -Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलच्या बक्षिसावर 'गदा'; संयोजक म्हणाले, "इर्षेपोटी पैलवानांना..."

ABOUT THE AUTHOR

...view details