ठाणे :मुंब्रा वाय जंक्शनवर एमडी, अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे येथे गुन्हे शाखा युनिट-१ ला मिळाली. विश्वसनीय माहितीच्या आधारावर शुक्रवारी दुपारी पोलीस पथकाने दोघा आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १०७ ग्रॅम एमडी, अंमली पदार्थ पावडर, १ अग्निशस्त्र आणि ९ जिवंत काडतुसे आणि ३ चॉपर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात (crime branch action in Thane) आला.
असा रचला सापळा : शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा वाय जंक्शन मुंब्रा ठाणे येथे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून सावजाची पोलीस पथक वाट पाहत होते. काही वेळातच वाय जंक्शन उड्डाण पुलाच्या खाली, मुंबा शिळफाटा रोड, मुंब्रा, ठाणे येथे आरोपी अभिषेककुमार गुप्तेश्वर महतो, वय ३२, रा. रूम नंबर २, ओम साई लिला चाळ, विष्णु पाटील नगर, टाटा पॉवर रोड, साबे गांव, दिवा पुर्व, ठाणे, आरोपी विजय बहादुर मडे, २० रा. गणराज पॅलेस, ए विंग, रूम नं. ४०८, एन आर नगर, दिवा (पश्चिम) ता जि. ठाणे आले. दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने आरोपींना जेरबंद केले.