महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी 2 जणांना अटक; गुन्हे शाखा व नवघर पोलिसांची कारवाई - Two criminals arrested in Thane

भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात २३ डिसेंबरच्या मध्यरात्री जिक्र मोबाईल या दुकानात चोरी झाली होती. तब्बल १ लाख ३० हजाराचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

Two criminals arrested in Thane
ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी दोन जणांना अटक

By

Published : Dec 27, 2020, 8:05 PM IST

ठाणे -भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात २३ डिसेंबरच्या मध्यरात्री जिक्र मोबाईल या दुकानात चोरी झाली होती. तब्बल १ लाख ३० हजाराचे मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा -खुलेआम मद्यपान करणाऱ्यांची उघड्यावर लघुशंका; त्रस्त रहिवाशांची पोलिसांसह दारूबंदी खात्याकडे तक्रार

चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला होता आणि १ लाखापेक्षा अधिक वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरी केले होते. दुकानदाराच्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी आधी देखील शिक्षा भोगून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मीरा भाईंदर वसई विरार गुन्हेशाखा-१ व नवघर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

मीरा भाईंदर शहरात गुन्हेगारीत वाढ

मीरा भाईंदर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये दरोडा, मोटारसायकल, सोनसाखळी चोरी, दुकान फोडी या घटनांचा समावेश आहे. मात्र, मीरा भाईंदर पोलिसांनी या गुन्हेगारीला आवळण्यासाठी कंबर कसली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्यापासून पोलिसांच्या कामात गती आली आहे. त्यामुळे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसात पोलिसांनी चरस विक्रेता, गुटखा माफिया, सोनसाखळी चोर, अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे.

हेही वाचा -ठाण्यातील कोविड सेंटर घोटाळ्यात मातोश्रीचे कनेक्शन; किरीट सोमैयाचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details