महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक - बिबट्याची कातडी तस्करी

उल्हासनगर येथे दोघा तस्करांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या दोघा आरोपींकडून २० लाख रुपये किमतीची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे.

जप्त केलेली बिबट्याची कातडी

By

Published : Oct 2, 2019, 7:29 PM IST

ठाणे -बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. दोघा आरोपींकडून २० लाख रुपये किमतीची कातडी जप्त केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर येथे २० लाख रुपये किमतीची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली

संतोष हंगारगे (जालना) व प्रकाश वाटूडे (परभणी) अशी अटकेत केलेल्या तस्करांची नावे आहेत. उल्हासनगर येथील शहाड ब्रिजजवळ २ व्यक्ती बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. दोन व्यक्ती संशयितरीत्या शहाड ब्रिजजवळ फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता पिशवीत बिबटयाची सुकलेली कातडी मिळाली.

हेही वाचा - गांधी जयंतीनिमित्त ठाण्यात चिमुकले गांधी दिसले रस्त्यावर

ही कातडी त्यांनी कुठून आणली व कोणाला विकणार होते, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details