ठाणे - भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात नशेबाज गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. त्यामुळे त्यावर आळा बसावा म्हणून पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यातच शहरात नशेचा मोठ्या प्रमाणात गोरखधंदा करणाऱ्या दोघा तस्करांना शांतीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तस्करांकडून नशेसाठी वापरात येणारे कफ सिरप, गोळ्यांसह मॅफेड्रॉन (एमडी) असा लाखो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशरफ इजाज अहमद अन्सारी (रा. भिवंडी) आणि मोहम्मद अली इरशाद अली कुरेशी (रा. वर्तकनगर, ठाणे) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत.
नशेसाठी वापरणाऱ्या कफसिरपच्या 960 बाटल्या जप्त
कफ सिरप व गोळ्या विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना मिळाली. त्यानुसार, आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती देत कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक रवींद्र पाटील, निलेश जाधव, भोलासो शेळके, रवींद्र चौधरी, सुशील इथापे, रिजवान सैय्यद, तुषार वडे, प्रसाद काकड, किरण मोहिते, दीपक सानप, अमोल इंगळे, किरण जाधव, रवी पाटील, श्रीकांत पाटील या पथकाने खंडूपाडा येथील बाबा हॉटेल परिसरात सापळा रचला. तेथे दुचाकीवरून आलेल्या संशयित अशरफ इजाज अहमद अन्सारी यास ताब्यात घेतले.
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या Acan - 1 गोळ्या जप्त