महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : मित्रासोबत एकांतात वेळ घालवायला गेली अन् दोघांनी केला बलात्कार, 24 तासात आरोपी अटकेत - अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

ठाकुर्लीतील खाडी किनारी झाडाझुडपात भर दिवसात एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलीस असल्याचा धाक दाखवून दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, नराधमांनी बलात्कार करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून पळून गेले होते. या दोघांनाही 24 तासांत अटक करण्यात आली आहे.

Thane Crime
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Jan 29, 2023, 8:02 PM IST

Updated : Jan 29, 2023, 8:13 PM IST

बलात्कार प्रकरणी पोलिसांचे बयान

ठाणे :याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही नराधमांचा मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. विष्णु सुभाष भांडेकर (वय २५, रा. नेवाळी नाका, कल्याण पूर्व ) आशिष प्रकाशचंद गुप्ता ( वय, ३२ रा. डोंबिवली पूर्व ) अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे घटना ?पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. दोघे फिरत असताना दोन अनोळखी नराधम त्या ठिकाणी आले. त्यानंतर दोघाही नराधमांनी पीडितेला आणि तिच्या मित्राला पोलीस असल्याची थाप मारून सांगितले कि, तुम्ही या ठिकाणी आलात तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगितले जाणार. त्यापैकी एका नराधम पीडित विद्यार्थिनीला खाडी किनारी काही अंतरावर असलेल्या झाडीझुडपात घेऊन गेला. त्या निर्जनस्थळी तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. एवढाच नव्हे तर त्या नराधमाने त्याच्याकडील मोबाईलमध्ये बलात्कार करतानाचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हारयरल करण्याची धमकी दिली.

दुसऱ्याही आरोपीकडून बलात्कार: दुसरा नराधमाने पीडितेसोबत असलेल्या मित्राला घेऊन ठाकुर्ली स्टेशन परिसरात आला. त्यावेळी त्या नराधमाने पीडितेच्या मित्राला सांगितले. आमचे साहेब त्या ठिकाणी बसले आहे तू चल त्यांच्याशी बोल. या दरम्यान पहिल्या नराधमाने पीडितेवर बळजबरीने बलात्कार केल्यानंतर त दुसरा नराधम पीडितेच्या मित्राला स्टेशन परिसरात सोडून पुन्हा खाडी किनारी येऊन त्याने देखील विद्यार्थिनीवर बळजबरीने बलात्कार केला.

गुन्हा दाखल :पीडित विद्यार्थिनीने घडलेला प्रसंग आपला नातेवाईकांना सांगितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी पीडितेला घेऊन आधी हा प्रकार डोंबिवली जीआरपीकडे गेला. मात्र घडलेला धक्कादायक प्रकार हा डोंबिवली पश्चिम भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पीडित तरुणीला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. विष्णुनगर पोलिसांनी काल रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणात अनोखळी दोन नराधमावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे विष्णू नगर आणि मानपाडा पोलिसांनी नराधमांना शोधण्यासाठी पाच पथक तयार केली होती. त्यानंतर परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये नराधमाची ओळख पटवून आणि तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने तसेच गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारावर दोन्ही नराधमांना अटक केली. मानपाडा पोलीस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक सुनील तारमळे आणि वनवे, यांनी त्यांच्या पथकासह दोघांना २४ तासातच बेड्या ठोकल्या आहे.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार :विष्णु सुभाष भांडेकर हा नराधम बिगारी कामगार असून पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात आणखी काही गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्याकडून वर्तविण्यात आली आहे. तर आशिष प्रकाशचंद गुप्ता हा नराधम डोंबिवली पूर्वेडील एका चहाच्या टपरीवर कामाला होता.

हेही वाचा :Hindu Organizations March Mumbai : लव जिहाद विरोधात कायदा करा; हिंदू संघटनेचा मुंबईत महामोर्चा

Last Updated : Jan 29, 2023, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details