महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात कोरोना चाचणीचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक - Thane District Latest News

ठाण्यात कोरोना चाचण्यांचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या कोविड सेटंरमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ते निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात येत होता.

ठाण्यात कोरोना चाचणीचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक
ठाण्यात कोरोना चाचणीचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक

By

Published : May 19, 2021, 6:56 PM IST

ठाणे -ठाण्यात कोरोना चाचण्यांचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या कोविड सेटंरमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ते निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात येत होता.

ठाण्यात कोरोना चाचणीचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक

बनावट रिपोर्ट प्रकरणात दोन जणांना अटक

खासगी लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता महापालिकेच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयातून देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्किंग प्लाझा रुग्णालयात निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातील या रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निगेटिव्ह रिपोर्ट बनवून घेतले. यामध्ये दोन पॉझिटिव्ह असलेल्या मृतदेहांचे देखील निगेटिव्ह रिपोर्ट बनवण्यात आले. यानंतर खात्री पटल्याने पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीला अटक केली. अफसर तेजपाल मंगवाना असे या आरोपीचे नाव आहे. अफसर हा परिचर म्हणून रुग्णालयात कार्यरत आहे. दरम्यान अफसरसोबतच अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. संकपाल भारकर धवने असे त्याचे नाव आहे. अवघ्या 1250 रुपयांमध्ये ते रुग्णाला बनावट रिपोर्ट देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा -सत्ताधाऱ्यांना मराठा आंदोलन पेलवणार नाही, त्यामुळे लॉकडाऊनची खेळी - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details