ठाणे:मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना (काल्पनिक नाव) ही महिला उल्हासनगरमध्ये राहत असून तिला १५ वर्षांची मुलगी आहे. या अल्पवयीन मुलीने दोन वर्षांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंडवर स्वतःचे फोटो अपलोड केले होते. आरोपी पियूष कृपलानी याने त्या मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंडवरून तिचे फोटो कॉपी केले. यानंतर त्याला एडिट करून त्याचे अश्लील फोटोत रूपांतर केले. आरोपीने ते फोटो आपल्या मोबाइलच्या गॅलरीत सेव्ह करून ठेवले होते.
समाजसेवकामुळे फुटले बिंग:आरोपी पियूष हा काही दिवसांपूर्वी जुगारात पैसे हरला होता; मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने जुगार अड्ड्याच्या मालकाने त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाईल परत मिळवण्यासाठी पियूषने त्याचा मित्र वरुण रोहराला गाठले. त्याच्याकडून 16 हजार रुपये उधार घेऊन मोबाईल सोडवून आणला. गेल्याच आठवड्यात आरोपी वरुण रोहरा हा जुगारी पियूषच्या मोबाइल गॅलरीमधील फोटो, व्हिडिओ बघत होता. यावेळी त्याला मोबाईल गॅलरीत अनेक मुलींचे अश्लील फोटो आढळले. वरुणने याची माहिती त्याच्या ओळखीचा समाजसेवक नवीन डिगवानी यांना दिली. त्यानंतर समाजसेवकाने मोबाईल मधील अनेक मुलींचे फोटो तपासले. त्यामध्ये एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ओळखीची निघाली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईला अश्लील फोटोबद्दल माहिती दिली गेली.