भिवंडीतुन ११ लाखांचा ज्वलनशील रासायनिक साठा जप्त; दोघांवर गुन्हा - flammable chemical stocks seized in bhiwandi
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारखान्यात धाड टाकली असता, या ठिकाणी ११ लाख ५५ हजार ६०० रुपयांच्या रासायनिक पदार्थाची साठवणूक केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत अवैध साठा पोलिसांनी जप्त करून वसीम व मुज्जमील या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात भादवि कलम २८५,३३६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ह आर.आर.चौधरी करत आहेत.
ठाणे -भिवंडी शहरातील गैबीनगर परिसरातील खान कंपाउंडमधील ममता अपार्टमेंटध्ये बेकायदा घातक ज्वलनशील रासायनिक पदार्थाचा साठा पोलिसांच्या धाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वसीम इसाक हिंगोरा (३६ रा.मुंबई वेस्ट), मुज्जमील मोहमद उमर खान (रा.गैबीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
घातक रसायनचा कारखान्यात साठा -आरोपी वसीम आणि मुज्जमील या दोघांनी आपसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भिवंडीतील गैबीनगर परिसरातील ममता अपार्टमेंटमध्ये अगरबत्तीचा कारखाना थाटला. या कारखान्यात अगरबत्तीच्या उत्पादनासाठी कोणताही अधिकृत परवाना न बाळगता लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असा घातक रसायनचा कारखान्यात साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारखान्यात धाड टाकली असता, या ठिकाणी ११ लाख ५५ हजार ६०० रुपयांच्या रासायनिक पदार्थाची साठवणूक केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत अवैध साठा पोलिसांनी जप्त करून वसीम व मुज्जमील या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात भादवि कलम २८५,३३६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ह आर.आर.चौधरी करत आहेत.