महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीरा भाईंदर मध्ये एकाच नंबरच्या दोन रूग्णवाहीका; मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - ambulances news

मीरारोडच्या शीतल नगर व साईबाबा नगर नगर येथे एकाच नंबरच्या दोन अंबुलन्स असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.स्थानिक नगरसेवक राजीव मेहरा यांच्या तक्रारीनंतर मीरा रोड पोलिसांनी दोन्ही अंबुलन्स जप्त केल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ambulance
एकाच नंबरच्या दोन रूग्णवाहीका

By

Published : Mar 4, 2021, 2:13 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे) : मीरारोडच्या शीतल नगर व साईबाबा नगर नगर येथे एकाच नंबरच्या दोन रूग्णवाहीका असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.स्थानिक नगरसेवक राजीव मेहरा यांच्या तक्रारीनंतर मीरा रोड पोलिसांनी दोन्ही रूग्णवाहीका जप्त केल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

शासनाची फसवणूक
मीरा रोड परिसरातील काँग्रेस नगरसेवक राजीव मेहरा यांनी मीरा भाईंदर वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. मीरारोड परिसरात एकाच नंबरच्या दोन रूग्णवाहीका सारख्या फिरत आहेत. पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही रूग्णवाहीका जप्त करून दोन जणांना अटक केली आहे. चार जणां विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यामधील मुख्य आरोपी डॉ आशुतोष चोमल व त्यांचा मुलगा तुषार चोमल फरार असून पोलीस तपास करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही रूग्णवाहीका रस्त्यावर फिरत असून पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली असता बोगस आढळून आली आहेत. यामुळे सदर आरोपींनी गेल्या अनेक दिवसांपासून शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये एकूण चार आरोपी असून डॉ आशुतोष चोमल व तुषार चोमल हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सदर कारवाई वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी केली असून पुढील तपास मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश कांबळे,एकीलवले पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details