ठाणे : गणेश कोकाटे याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली ( Two Accused Arrested in Ganesh Kokate Murder Case ) होती. गणेश कोकाटे याच्या हत्याचा गुन्हा हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. गणेश कोकाटे हादेखील सराईत असल्याची माहिती पोलीस सूत्रांना ( Strike operation of Crime Branch Unit 5 ) मिळाली होती. तर या पूर्वीही गणेश कोकाटेवर गोल्डन डाईज नाक्यावर १७ सप्टेंबर, रोजी गोळीबार करण्यात आलेला होता. यात गणेश कोकाटे बचावला.
कोकाटेंच्या गाडीचा पाठलाग करून आरोपींकडून गोळीबारचिटलसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ७ डिसेंबर रोजी दुचाकीवरील आरोपींनी कोकाटेंच्या गाडीचा पाठलाग करून कोकाटे याच्या गोळीबार केला होता त्यातच त्याचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पोबारा केला होता. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला होता. तर न्यायालयाने आरोपींना फरारी घोषित केले होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने तपास सुरू केला आहे.
गणेश कोकाटेंच्या हत्येप्रकरणी दोन आरोपी गजाआड; गुन्हे शाखा युनिट-५ ची धडक कारवाई युनिट-५ चे स.पो.नि. भूषण शिंदे आणि त्यांचे सहकाऱ्यांची धडक कारवाईतपासात तांत्रिक विश्लेषणमध्ये सदर गुन्हा हा धनराज उर्फ धन्या तोडणकर व त्याचा एक साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा, युनिट-५ चे स.पो.नि. भूषण शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ९-३० वाजण्याच्या सुमारास इंदिरानाका परिसरात आरोपी येणार असल्याची माहिती समोर आली. पोलीस पथकाने सापळा रचून संशयित आरोपी धनराज रमाकांत तोडणकर (३३) रा. इंदिरानगर, ठाणे व संदीपकुमार सोमेलाल कनोजिया, (२७) रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
न्यायालयाने केले फरारी घोषित, आरोपीवर श्रीनगरमध्ये ३ गुन्हेमृतक गणेश कोकाटे यांची हत्या केल्यानंतर आरोपींची पोबारा केला. तब्बल एक महिना पोलिसांना गुंगारा देण्यात आरोपी यशस्वी झाले. तर पोलीस पथकेही त्यांच्या मागावर होते. दरम्यान, हत्येतील आरोपीना अखेर मंगळवारी(३ डिसें) रोजी सकाळी अटक कार्नाय्त आली. अटकेतील आरोपी धनराज रमाकांत तोडणकर याच्यावर ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्राने हल्ला असे तीन गुन्हे दाखल आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वपोनि विकास घोडके यांनी दिली.
माथाडी आणि ठेकेदारीच्या स्पर्धेतून हत्याठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे. गंगनचुंबी इमारतीसोबतच ठाण्यात गुन्हेगारी प्रवृत्तींनी शिरकाव केला. माथाडी संघटनेचे पांघरून घेऊन गुन्हेगार लेबर किंवा ठेकेदारी मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा सुरु झाल्याचे चित्र आहे. याच माथाडीच्या ठेकेदारीच्या स्पर्धेतून ठाण्यात अनेक गोळीबाराच्या घटनाही घडलेल्या आहेत. गाईंशी कोकाटेंची हत्या ही याच स्पर्धेतून झाली. गणेश कॉकटेल १७ सप्टेंबरला नशिबाने साथ दिली. मात्र ७ डिसेंबर रोजी मात्र काळाने झडप घातली अन कोकाटेंची हत्या झाली.