ठाणे- अपहरण करून तरुणांना लुबाडणाऱ्या दोघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. राजीव उर्फ राजू ढिल्लोर व गुरू उर्फ भुऱ्या परदबादे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ठाण्यात अपहरण करून लुबाडणाऱ्या आरोपींना अटक - ठाणे गुन्हेवार्ता
अपहरण करून तरुणांना लुबाडणाऱ्या दोघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. राजीव उर्फ राजू ढिल्लोर व गुरू उर्फ भुऱ्या परदबादे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
रस्त्यावरून चालताना धक्का लागल्याने मोबाईल पडला, स्क्रीन तुटला, असे बहाणे करत भामट्यांनी एका गृहस्थाचे अपहरण केले. त्याच्याजवळील एटीएम कार्ड हिसकावून या एटीएमच्या आधारे दारू खरेदी तसेच एका दुकानातून मोबाईल खरेदी केल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी या लुटारूंचा शोध सुरू केला होता. या गुन्ह्यांचा समांतर तपास अँटी रॉबरी स्कॉड करत होता. या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथून राजीव उर्फ राजू ढिल्लोर व गुरू उर्फ भुऱ्या परदबादे या दोघांना खडेगोळवली येथून बेड्या ठोकल्या.
या दोघांकडून पोलिसांनी रिक्षाही जप्त केली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. यामधील राजीव उर्फ राजू ढिल्लोर याच्या विरोधात कोळसेवाडी, मध्यवर्ती, मानपाडा पोलीस ठाण्यात याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली.
हेही वाचा - पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा